मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल...
-ग्रेस
" माझ्या कवितेचं मूळ माझ्या दुःखात आहे.
(महाकवीच्या शोकाचा श्लोक होतो .
'श्लोकत्वमापद्यत यस्य श्लोकः')
हे दुःख वाहतं आहे म्हणजे अखंड आहे.
त्याचं नातं मनुष्यजातीच्या शाश्वत दुःखाशी आहे.
महानदी जशी कळीकाळातून वहातच असते तसा
त्या दुःखाचा प्रवाह आहे.
वरवर पहाता दिसतो तेवढाच त्याचा आकार नाही.
खोल नदी जशी अपार जलाला साठवते तसं ते दुःख आहे.
माझी कविता एखाद्या कोमल सुंदर फुलासारखी वाटते पण ती फुलं कोरली आहेत दगडासारख्या घन शाश्वत अन् पेलायला कठोर असलेल्या माझ्या दुःखातून "
असा अर्थ मला भावतो. मला भावलेला अर्थ प्रत्यक्ष ग्रेसना अभिप्रेत असेलच असं नाही. काव्य जितकं गूढ, सूचक अन् अमूर्त होत जातं, तितकं ते अधिकाधिक
व्यक्तिनिष्ठ अन् विविधार्थप्रवण होतं.
-© चारुचंद्र उपासनी.
26 मार्च 2015
No comments:
Post a Comment