About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..


गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने; लेखक चारुचंद्र उपासनी.

गुजराथ निवडणुकीचं पहिलं पर्व संपलं ,दुसरं संपून निर्णय लागेलच. काॅन्ग्रेसींच्या मते हा निर्णय केंव्हाच ठरून गेला असून , गुजराथसह सर्व भारतातील मतदात्यांना , मोदी नावाच्या अत्यंत नीच दुष्ट भ्रष्ट देशद्रोही व्यक्तीला आणि त्याच्या पक्षाला केंव्हा पराभूत करू आणि देशातल्या एकमेव वंशातच जो योग्यतम स्वच्छतम कुशलतम आणि देशभक्तीत सर्वश्रेष्ठ निपजू शकतो त्या घराण्यातील नरहीरक (माणसांमधला हिरा) राहूल अर्थात माननीय राहूलजी यांना आणि त्यांच्या काॅन्ग्रेस पक्षाला केंव्हा सत्तास्थानावर बसवू , असं झालं आहे.
एवढच नव्हे तर , आता या नंतर भविष्यात होणार्या ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेच्या सर्व निवडणुकांमध्ये कधीही चुकूनही या दैवी घराण्याचं नेतृत्व असलेली काॅन्ग्रेस सोडून कोणत्याही पक्षास आणि त्या पक्षाच्या उपटसुंभ प्रमुखास मत द्यायचं नाही असा उग्र निश्चय प्रत्येक भारतीयानं केला आहे.
प्रत्येक काॅन्ग्रेसीची अशी दृढ श्रद्धा आहे की मोदी आणि भाजप हे जे 19 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नामशेष होणार आहेत , त्याचा शुभारंभ आता गुजराथ मधून होणार आहे.
सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्येतिहासात लोकांनी हे दैवी घराणं आणि त्याचा काॅन्ग्रेस पक्ष डावलून दोनदा काॅन्ग्रेसेतर पक्षाला सत्तेत बसवलं पण आता अनुभवातून शहाणे झालेले लोक असा देशबुडवा अव्यापारेषु व्यापार करणार नाहीत. माननीय राहूलजींचं तरुण वय पहाता लोक त्यांना निदान सहा ते सात सार्वत्रिक निवडणुकांत भरघोस मतांनी निवडणून देतील म्हणजे भविष्यात तीस पस्तीस वर्ष आता देश अत्यंत कुशल आणि कुलीन नायकाच्या हाती सुरक्षित आणि संपन्न होत असेल अर्थात त्यानंतरची पुढची तेवढीच वर्षे , माननीय राहूलजींचे थोर भाचे जे आज सोळा सतरा वर्षांचे आहेत ते माननीय रेहानजी देशाचा कार्यभार सांभाळून देशाला उपकृत करतील.
हो पण गुजराथचा निर्णय काही अशुभ असा देशविरोधी लागला म्हणजे काॅन्ग्रेसचा पराभव झाला तर ?
तर काय! कान्ग्रेसींच्या मते तरीही 19 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काॅन्ग्रेसचा जो नेत्रदीपक विजय होणार आहे हे सत्य तितकच अबाधित राहील. पण अशा स्थितीत, अर्थात अशी स्थिती येणारच नाही पण समजा आलीच तर मात्र काॅन्ग्रेसमध्ये एक असा प्रबळ गट निर्माण होण्याची शक्यता आहे की जो माननीय राहूलजींना निव्वळ अध्यक्षपद सांभाळू देऊन पंतप्रधानपदासाठी माननीया प्रियांकाजींना घोषित करावं अशी आग्रही मागणी करेल कारण माननीया प्रियांकाजींचा या सर्वोच्च पदावर तेवढाच वंशदत्त अन् वंशसिद्ध अधिकार आहे जेवढा माननीय राहूलजींचा.
कित्येक काॅन्ग्रेसींचं पूर्वीपासूनच असं मत आहे की
बुद्धीचं आणि ज्ञानाचं अपूर्व तेज , राजकारणातील उपजत कुशलता , देशासाठी अविरत त्याग करण्याची असीम सिद्धता, या दोन्ही भावंडांमध्ये पुरेपूर असली तरी या अद्भुत गुणांमध्ये माननीया प्रियांकाजी काकणभर सरसच ठरतात.
आता गुजराथ निवडणूकनिर्णयात काही विपरीत घडलं तर
' प्रियांका लाओ देश बचाओ '
च्या देशभक्तिप्रेरित आणि राजवंशनिष्ठ घोषणांनी दिल्लीचा परिसर दुमदुमून जाण्याची शक्यता आहे.
- ©चारुचंद्र उपासनी.

९ डिसेंबर २०१७.

No comments:

Post a Comment