About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

दोन बहिणींचा संवाद, भाग १ ते १५.


अध्ययनासाठी वाचनापेक्षा श्रवणाची परंपरा फार जुनी आहे हे आपण सर्व जाणतो..
त्याचमुळे साहित्य प्रसारासाठी मी अवलंबलेल्या मार्गात मला चांगला प्रतिसाद मिळत गेला..
माझ्या आवाजातील शिवचरित्र, सावरकर साहित्य, लाख्खो लोकांपर्यंत पोचलं..
या अनुभवातून मग जन्माला आली एक अभिनव कल्पना!!
आर्य समाज पिंपरी, यांनी प्रकाशित केलेल्या एका पुस्तकाची पुढील आवृत्ती काढायची होती.
सध्या अमेरिकेत वास्तव्य असलेले आर्य समाजाचे एक अनुयायी यांना अशी कल्पना आली की ही आवृत्ती छापण्यापेक्षा माझ्या आवाजात, केवळ ऑडिओ स्वरूपातच प्रकाशित करावी..
कारण याप्रकारे हे पुस्तक एकदाच प्रकाशित करणे म्हणजे त्याच्या अमर्याद प्रती (copies) काढणे होय!
'महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा' यांनी हा प्रकल्प प्रायोजित केला आणि आज हे पुस्तक तुमच्यासमोर सादर करत आहे.😊🙏🏻
दुष्टांवर सज्जनांचा, असत्यावर सत्याचा, तिमिरावर प्रकाशाचा विजय हा सृष्टीचा नियमच आहे. वैदिक सिद्धांतांचे समग्र ज्ञान करून देण्याच्या दृष्टीने महर्षी दयानंद सरस्वती लिखित 'सत्यार्थ प्रकाश' हा एक अद्वितीय ग्रंथ आहे.
तथापि प्रारंभिक ज्ञान व विषयाबद्दल जिज्ञासा वाढवण्यासाठी असलेल्या काही पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे, "वेदांच्या आधारावर दोन बहिणींचा संवाद"
तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की असा कोणता संवाद आहे ज्याची एवढी चर्चा केली जात आहे!?
जर हे समजून घ्यायचे असेल तर हा संवाद आरंभापासून शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या परिचितांना पण ऐकायला सांगा..!
वर उद्धृत केलेले हे छोटेसे पुस्तक १५ भागांमध्ये, माझ्या आवाजात, खाली देत असलेल्या लिंक्स वर निःशुल्क उपलब्ध आहे..
- गीता चारुचंद्र उपासनी.

दोन बहिणींचा संवाद, भाग 1.

दोन बहिणींचा संवाद, भाग 2.

दोन बहिणींचा संवाद, भाग 3.

दोन बहिणींचा संवाद, भाग 4.

दोन बहिणींचा संवाद, भाग 5.

दोन बहिणींचा संवाद, भाग 6.

दोन बहिणींचा संवाद, भाग 7.

दोन बहिणींचा संवाद, भाग 8.

दोन बहिणींचा संवाद, भाग 9.

दोन बहिणींचा संवाद, भाग 10.

दोन बहिणींचा संवाद, भाग 11.

दोन बहिणींचा संवाद, भाग 12.

दोन बहिणींचा संवाद, भाग 13.

दोन बहिणींचा संवाद, भाग 14.

दोन बहिणींचा संवाद, भाग 15.

No comments:

Post a Comment